गाडीत EVM सापडलेला भाजप उमेदवार म्हणतो, 'आम्ही तर फक्त मदत केली'

evm
evm
Updated on

दिसपूर- गाडीमध्ये ईव्हीएम सापडल्याने वादात सापडलेले आसामचे भाजप उमेदवार कृष्णेंदु पॉल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पॉल यांनी ईव्हीएम चोरल्याच्या आरोपाचे खंडन केले असून त्यांच्या ड्रायव्हरने पोलिंग कर्मचाऱ्यांना मदत करत लिफ्ट दिली होती असं म्हटलं आहे. पॉल म्हणाले की, 'त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि पोलिंग अधिकाऱ्यांनी मदत मागितल्याने त्याने त्यांना गाडीत बसवून घेतलं. माझा ड्रायव्हर कारमध्ये होता. त्याला पोलिंग अधिकाऱ्यांनी मदत मागितली, त्यामुळे त्याने मदत केली. गाडीवर एक स्टिकर लावण्यात आलं होतं, त्यावर स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं की गाडी भाजप उमेदवाराची आहे. मला माहिती नाही की, पोलिंग अधिकाऱ्यांना याची माहिती होती का नाही. आम्ही फक्त मदत केली.'कृष्णेंदु पॉल यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. 

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रकिया गुरुवारी पार पडली. यावेळी ईव्हीएम मशिनच्या वाहतुकीमुळे वाद निर्माण झाला. आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडिओ व्हायरल  झाला होता. या व्हिडिओत एक निवडणूक अधिकारी कारमधून ईव्हीएम मशिन घेऊन जाताना दिसला. ईव्हीएम ज्या गाडीतून नेण्यात आलं ती गाडी भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची होती असं समोर आलं. रिपोर्टनुसार, पोलिंग अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ईव्हीएमला आयोगाच्या गाडीने स्ट्रॉंग रुममध्ये नेले जात होते, पण मध्येच गाडी खराब झाल्याने त्यांनी लिफ्ट घेतली होती. 

या सर्व घटनेमुळे मोठा वाद निर्माण झालाय. निवडणूक आयोगाने याची दखल घेत 4 अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. खासगी गाडीमध्ये ईव्हीएम सापडल्याने चिडलेल्या लोकांनी गाडीवर हल्ला केला होता. यावेळी पोलिंस अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांना हस्तक्षेप कराला लागला होता. आयोगाचं म्हणणं आहे, की ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून सील तुटलेलं नाही. असे असले तरी निवडणूक आयोगाने या फेरनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रकारच्या शंकेला दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. 

काँग्रेसने या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.  निवडणुक आयोगाची गाडी खराब, भाजपाची नैतिकता खराब, लोकशाहीची अवस्था खराब! असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या प्रकरणाचा समाचार घेतला आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ शेअर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्यांनी म्हटलंय की, काय स्क्रीप्ट आहे? निवडणूक आयोगाची गाडी खराब झाली, त्याचवेळी तिथे एक गाडी  प्रकट झाली. भोळा निवडणूक आयोग त्यात बसून प्रवास करत राहिला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com