esakal | मतदानानंतर EVM भाजप उमेदवाराच्या कारमध्ये; 4 अधिकाऱ्यांचे निलंबन
sakal

बोलून बातमी शोधा

assam

आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ व्हायरल  झाला आहे. या व्हिडिओत एक निवडणूक अधिकारी कारमधून ईव्हीएम मशिन घेऊन जाताना दिसत आहे.

मतदानानंतर EVM भाजप उमेदवाराच्या कारमध्ये; 4 अधिकाऱ्यांचे निलंबन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिसपूर - आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रकिया गुरुवारी पार पडली. यावेळी ईव्हीएम मशिनच्या वाहतुकीमुळे वाद निर्माण झाला आहे. आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ व्हायरल  झाला आहे. या व्हिडिओत एक निवडणूक अधिकारी कारमधून ईव्हीएम मशिन घेऊन जाताना दिसत आहे. भाजप नेत्याची ही कार असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने चार जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे की असे अनेक प्रकार समोर येत आहेत आणि निवडणूक आयोगाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिलला पार पडले. यावेली 39 जागांसाठी जवळपास 74.64 टक्के मतदान झाले. तर पहिल्या टप्प्यात 72.14 टक्के इचतं मतदान झालं होतं. 

हे वाचा - PM मोदींविरोधात वाराणसीतून ममता बॅनर्जी निवडणूक लढवणार?

प्रियांका गांधींनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलं की, जेव्हा निवडणुका असतात तेव्हा खासगी गाड्यांमधून ईव्हीएम घेऊन जाण्याचे प्रकार समोर येतात. या गोष्टी सामान्य आहेत. विशेष म्हणजे या गाड्या भाजप नेता किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या असतात. अशा प्रकरणात एकमेव घटना असल्याचं सांगत एक चूक मानून फेटाळून लावल्या जातात. व्हिडीओ समोर आणणाऱ्यांबाबत भाजपकडून वेगळीच माहिती पुढे सांगितली जाते. प्रत्यक्षात अशा अनेक घटना घडत असून काहीच पावलं उचलली जात नाहीत. निवडणूक आय़ोगाने कठोर पावले उचलायला हवीत. सर्व राष्ट्रीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापरावर पुन्हा विचार करायला हवा. 

हेही वाचा- 'वेदना पाहवत नव्हत्या'; पत्नीसह दोन मुलांचा खून करून तरुणाची आत्महत्या

पाथरकांडी विधानसभा मतदारसंघात एक ईव्हीएम ताब्यात घेतलं आहे. ज्या गाडीतून ईव्हीएम घेऊन जात होते त्या गाडीला गर्दीने रोखलं होतं. लोकांचे म्हणणे होते की, संबंधित गाडी ही निवडणूक आयोगाची नाही. निवडणूक आयोगाची गाडी नादुरुस्त झाल्यानं तिथूनच जाणाऱ्या एका गाडीला अधिकाऱ्यांनी थांबवले. ही गाडी भाजप उमेदवाराची नव्हती. त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला. पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईव्हीएम सुरक्षित असून छेडछाड झाली नसल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

ईव्हीएम ज्या गाडीतून नेण्यात आलं ती गाडी भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची होती असं समोर आलं आहे. त्यांच्या गाडीत ईव्हीएम असल्याचं समजल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचे व्हिडिओ स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केले असून त्यातलाच एक व्हिडिओ प्रियांका गांधी यांनी शेअर केला आहे. 

loading image