esakal | PM मोदींना आव्हान देणार ममतादीदी, वाराणसीतून लोकसभेच्या मैदानात?
sakal

बोलून बातमी शोधा

mamata_20banerjee_20narendra_20modi.jpg

दीदी, तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात, ही अफवा खरी आहे का? तुम्ही आधी नंदीग्रामला गेले आणि लोकांनी तुम्हाला आता उत्तर दिले आहे.

PM मोदींना आव्हान देणार ममतादीदी, वाराणसीतून लोकसभेच्या मैदानात?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप आणि सत्तारुढ तृणमूल काँग्रेस (टीएमसी) दरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पराभूत होणार असल्याचा दावा केला. त्यानंतर टीएमसीने यावर पलटवार केला आहे. ममता बॅनर्जी या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून उभारणार असल्याची शक्यता टीएमसीच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका टि्वटमुळे निर्माण झाली आहे. 

टीएमसीने केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, दीदी नंदीग्राममध्ये विजयी होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. नरेंद्र मोदीजी, पश्चिम बंगालमध्ये उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया आता संपली आहे. आपल्या खोटारडेपणातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका. 2024 मध्ये सुरक्षित मतदारसंघाचा शोध घ्या, कारण तुम्हाला वाराणसी मतदारसंघातून आव्हान दिले जाईल. 

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी दुपारी पश्चिम बंगालमधील एका सभेत ममता बॅनर्जी या शेवटच्या टप्प्यात दुसऱ्या जागेवरुन निवडणूक लढवू शकतात, असे वक्तव्य केले होते. परंतु, टीएमसीने मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी हे दिशाभूल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा- 'वेदना पाहवत नव्हत्या'; पत्नीसह दोन मुलांचा खून करून तरुणाची आत्महत्या

पंतप्रधान मोदी जयनगर येथील सभेत म्हणाले होते की, दीदी, तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात, ही अफवा खरी आहे का? तुम्ही आधी नंदीग्रामला गेले आणि लोकांनी तुम्हाला आता उत्तर दिले आहे. जर आता तुम्ही दुसरीकडे जाणार असाल तर बंगालचे लोक तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार आहेत. 

दरम्यान, नंदीग्राम बंगालमधील सर्वात हायप्रोफाइल मतदारसंघ बनला आहे. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि नुकताच टीएमसी सोडून भाजपत सामील झालेले सुवेंदू अधिकारी यांच्यात सामना होत आहे. टीएमसीचे प्रवक्ते तपस रॉय यांनी म्हटले की, 2024च्या निवडणुकीची उलट गणती सुरु झाली आहे. मोदींना वाराणसीमधून कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. ममता बॅनर्जी वाराणसीतून निवडणूक लढवणार की नाही हा निर्णय पक्ष आणि पक्षाचे सुप्रीमो घेतील. 

loading image