रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टराला मारहाण, Video Viral

रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टराला मारहाण, Video Viral

कोरोना महामारीच्या (covid-19) या संकटामध्ये डॉक्टर, नर्स (nurse), आरोग्यसेवक, पोलीस यांच्या रुपाने देव आपल्याला मदत करत आहे. कोरोना संकटात सर्वजण आपल्या जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत. पण फ्रंटलाइन वर्करसोबत दुर्व्यवहार अथवा मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यातील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रागाच्या भरात ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टराला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार रुग्णालयात घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक ज्युनिअर डॉक्टरला लाथाबुक्यांनी मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. काहींच्या हातात झाडू आणि भांडी दिसत आहेत. यात काही लोक डॉक्टरला जमीनीवर पाडून जबर मारहाण करताना दिसत आहेत. कोणीही या डॉक्टरच्या बचावासाठी पुढे आलेलं नाही. या व्हिडिओला मुख्यंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी रिट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. तसे उच्चस्तरिय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यापर्यंत प्रकरण पोहचल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 24 जणांना अटक केली असून चार्चशीट दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरला न्याय मिळेल, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्येही म्हटलं आहे. आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सवर होणारे हे गंभीर हल्ले प्रशासन सहन करणार नाही. त्यांनी याबाबत आसामसचे स्पेशल डीजीपी जी पी सिंह आणि आसाम पोलिसांना निर्देश देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे म्हणाले आहेत.

रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टराला मारहाण, Video Viral
Viral Video : जिल्हा रुग्णालयात गोंधळ; नर्सनं लगावली डॉक्टरच्या कानशिलात

मारहाण झालेल्या डॉक्टराचं नाव सीयूज कुमार सेनापती असल्याचं समोर आलं आहे. सीयूज कुमार सेनापती यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, 'रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं होतं. मात्र, मी रुग्णाला तपासायला गेल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली. मलाही मारहाण केली.'

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आसाम युनिटनं डॉक्टरांच्या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पोलिसांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com