esakal | VIDEO - आसाममध्ये चहाचं राजकारण; प्रियांका गांधी पोहोचल्या थेट मळ्यात

बोलून बातमी शोधा

priyanka gandhi assam tea garden}

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या दोन दिवसाच्या आसाम दौऱ्याला सोमवारपासून सुरवात झाली. त्यांनी सोमवारी कामाख्या देवी मंदिरात जाऊन पूजा केली. 

VIDEO - आसाममध्ये चहाचं राजकारण; प्रियांका गांधी पोहोचल्या थेट मळ्यात
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - आसाम विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता राजकीय नेत्यांच्या प्रचार दौऱ्यांचा धुराळा सुरु झाला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. याठिकाणी मिशन आसाम अंतर्गत त्यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी राज्यातील सधारू टी स्टेट इथं भेट दिली. यावेळी त्यांनी चहाच्या मळ्यातील कामगारांशी संवादस साधला. तसंच चहाच्या मळ्यात महिला कर्मचाऱ्यांसोबत पारंपरिक पद्धतीनं चहाची पानेही तोडली. प्रियांका गांधी यांची एक रॅलीसुद्धा होणार आहे. आसामाच्या निवडणुकीत चहाचा मळा आणि कामगार हा मुद्दा नेहमीच असतो.

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या दोन दिवसाच्या आसाम दौऱ्याला सोमवारपासून सुरवात झाली. त्यांनी सोमवारी कामाख्या देवी मंदिरात जाऊन पूजा केली. तत्पूर्वी आसामचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी लोकप्रिय गोपीनाथ बोरोडोई विमानतळावर त्यांचे स्वागत केले. तसेच लखीमपूर भागात स्थानिक लोकांबरोबर पारंपारिक नृत्य देखील केले. 

हे वाचा - सर्वसामान्यांना पुन्हा दणका; CNG आणि PNG च्या दरांमध्ये वाढ; जाणून घ्या काय आहेत भाव

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा म्हणाले, की प्रियांका गांधी यांच्या दौऱ्यावरून आसामचे नागरिक उत्सुक आहेत. त्यांची भेट ही आसामच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आशेचा किरण जागवणारी आहे. पाच वर्षापासून खोट्या आश्‍वासनाच्या जोरावर लोकांची फसवणूक करणाऱ्या लोकांचा पराभव करण्याची वेळ आली असून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची नवीन पहाट होण्याचे सर्वजण वाट पाहत आहेत.

हे वाचा - राज्यसभा आणि लोकसभा टीव्ही एकत्र; आता 'संसद टीव्ही' नावाचं एकच चॅनेल

प्रियांका गांधी यांनी कामाख्या देवी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आसामच्या लखीमपूरला रवाना झाल्या. तेथे त्यांनी चहा मळ्यात काम करणाऱ्या महिलांसमवेत पारंपरिक झुमर नृत्य केले. आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 27 मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिलला मतदान होणार असून राज्यात 126 विधानसभा सदस्य आहेत.