राज्यसभा आणि लोकसभा टीव्ही एकत्र; आता 'संसद टीव्ही' नावाचं एकच चॅनेल

RSTV LSTV
RSTV LSTV

नवी दिल्ली : राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्हीचे आता वेगवेगळं आणि स्वतंत्र अस्तित्व राहणार नाहीये. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्हीला एकत्रित करुन 'संसद टीव्ही' केलं गेलं आहे. याचा अर्थ असाय की आता दोन्हीही सदनांची कार्यवाही देशवासीयांना संसद टिव्हीवर पहायला मिळणार आहे. दोन्ही चॅनेल्सचे एकत्रिकरण आणि संसद टीव्ही नावाबद्दल राज्यसभा सचिवालय कार्यालयाकडून एक सर्क्यूलर जाहीर केलं गेलं आहे. निवृत्त आयएएस अधिकारी रवी कपूर यांना पुढील आदेशापर्यंत एक वर्षांच्या कार्यकाळासाठी संसद टीव्हीचे सीईओ बनवले गेले आहे. 

या एकत्रिकरणाबाबतची माहिती जून महिन्यात दिली गेली होती. तर काल सोमवारी राज्यसभा सचिवालयाच्या कार्यालयाकडून अधिकृतरित्या याची घोषणा केली गेली आहे. तर राज्यसभा टीव्हीचे सीईओ राहिलेले मनोज कुमार पांडे यांना त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आलं आहे. 

कोण आहेत रवी कपूर?
रवी कपूर 1986 बॅचचे आसाम-मेघालय केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते कापड मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी आसामच्या अतिरिक्त मुख्य सचिवाच्या पदावर आपली सेवा दिली आहे. तसेच त्यांनी उद्योग आणि वाणिज्य उद्योगमध्ये देखील काम केलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com