आसाममध्ये पावसाळ्यापूर्वी पूर; सुमारे 57 हजार नागरिकांना फटका

या पुरामुळे आतापर्यंत एका लहान मुलासह तिघांना जीव गमवावा लागला आहे.
aasam flood
aasam floodani
Summary

या पुरामुळे आतापर्यंत एका लहान मुलासह तिघांना जीव गमवावा लागला आहे.

पावसाळ्यापूर्वीच आसाममध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांची स्थिती बिकट झाली आहे. आसाम राज्यातील 7 जिल्ह्यांत 57 हजार लोकांना या पुराचा फटका बसला असून अधिकृत माहितीनुसार सुमारे 222 गावे या पुराच्या पाण्याखाली आहेत. राज्यातील एकूण 10321.44 हेक्टर शेतजमीन पुरात बुडाली असल्याची माहिती मिळत आहे. (assam flood 7 districts across 57000 people effect)

aasam flood
'दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला मंत्रिमंडळात ठेवलंय हे CM ठाकरे विसरले'

या पुरामुळे आतापर्यंत एका लहान मुलासह तिघांना जीव गमवावा लागला आहे. या आपत्तीत आतापर्यंत 202 घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय राज्यात 18 मे पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी आलेल्या या पूरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून पूरग्रस्त भागांमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य सुरु झाले आहे.

लष्कर, निमलष्करी दल, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. होजई, लखीमपूर आणि नागाव जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि कालवे पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी झालेल्या संततधार पावसामुळे दिमा हासाओ जिल्ह्यातील १२ गावांमध्ये दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रेल्वे रुळांचे नुकसान झाले आहे. डोंगराळ भागातही दळणवळण सेवेवर परिणाम झाला आहे. आसाममधील लुमडिंग विभागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हे लक्षात घेऊन ईशान्य सीमारेल्‍वेने गाड्यांच्या संचलनात अनेक बदल केले आहेत. पूर आणि पावसामुळे या मार्गावरील दोन गाड्या अडकल्या असून या गाड्यांमध्ये सुमारे 1400 प्रवासी आहेत.

aasam flood
..अन् कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारता जनाब उद्धव ठाकरे?

हवाई दल, एनडीआरएफ, आसाम रायफल्स आणि स्थानिक लोकांच्या मदतीने या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. भारतीय वायुसेनेने आसाममधील डितोकचेरा रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना विमानातून बाहेर काढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com