Assam Flood : आसाममधील पूरस्थिती अद्याप चिंताजनक; ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ

आसामची पूरस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून राज्यातल्या २२ जिल्ह्यांतील ३.४० लाख लोकांना फटका
assam flood situation worsens 340 lakh affected in 22 districts
assam flood situation worsens 340 lakh affected in 22 districtsSakal

गुवाहाटी : आसामची पूरस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून राज्यातल्या २२ जिल्ह्यांतील ३.४० लाख लोकांना फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे.

मंगळवारपर्यंत २१ जिल्ह्यांतील सुमारे ३.०७ लाख लोकांना फटका बसला होता. मात्र या संख्येत आता वाढ झाली आहे. तसेच पाऊस आणि पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, ब्रह्मपुत्रा नदीने धुब्री, गोलपारा, गुवाहाटी, तेजपूर आणि नेमतीघाटबरोबरच दिसांग, बुरिडिहिंग आणि सुबनसिरी येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. या कारणामुळे ३ लाख ४० हजार ९३७ लोकांना फटका बसला आहे.

माजुली जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या ठिकाणी सुमारे ६५ हजार जणांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यानंतर गोलपारा ५८,४३९, मोरीगाव ४४,१८१, विश्‍वनाथ ३६,६७१, शिवसागर २८,६६९ आणि लखीमपूर येथील २४,५९४ जणांना पुराचा फटका बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com