पोलिसांच्या चकमकीत तीन दरोडेखोर ठार; आरोपींच्या वाहनावरही गोळीबार I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Assam Crime News

अतिरेक्यांच्या टोळीचं नेतृत्व करणाऱ्या दरोडेखोरांना ठार करण्यात आलंय.

पोलिसांच्या चकमकीत तीन दरोडेखोर ठार; आरोपींच्या वाहनावरही गोळीबार

आसाममध्ये पोलिसांशी (Assam Police) झालेल्या चकमकीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन संशयित दरोडेखोर ठार झालेत. गोलपारा पोलिस अधीक्षक राकेश रेड्डी म्हणाले, गेल्या एक महिन्यापासून दरोडेखोर आणि खून करणाऱ्या आरोपींचा माग काढला जात होता. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास गोलपारामधील आगिया इथं सुपारी घेऊन जाणारं वाहन थांबवलं.

दरम्यान, वाहनातील प्रवाशांना बाहेर येण्यास सांगितलं असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी वाहनाच्या टायरवर गोळीबार केला, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून संशयित दरोडेखोरांनीही गोळीबार केला, त्यामुळं चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन संशयित दरोडेखोर जखमी झाले. त्यापैकी दोघांचा गोलपारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय. शाहजहान अली आणि सुशेन अली अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा: रशियासोबतचं युद्ध संपेना; अमेरिकेकडून युक्रेनला मोठी लष्करी मदत जाहीर

तर, दुसरी घटना कोकराझार जिल्ह्यात घडलीय. इथं एलएलएफबी अतिरेकी आणि दरोडेखोरांच्या टोळीचं नेतृत्व करणाऱ्या दरोडेखोराला ठार करण्यात आलंय. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीनं कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान पोलिसांनी गोळीबार करत दरोडेखोराला जखमी केलं. त्यानंतर रुग्णालयात नेलं असता, त्याला मृत घोषित करण्यात आलं.

Web Title: Assam Police Three Suspected Dacoits Killed Two Separate Incidents Of Encounter Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AssamCrime News
go to top