रशियासोबतचं युद्ध संपेना; अमेरिकेकडून युक्रेनला मोठी लष्करी मदत जाहीर

John Kirby
John Kirbyesakal
Summary

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटलाय.

युक्रेन आणि रशिया (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटलाय. रशियाच्या एवढ्या मोठ्या सैन्यासमोर युक्रेन इतके दिवस उभे राहू शकेल याची कुणालाही कल्पना नव्हती. हे युद्ध लढण्यासाठी युक्रेनला पाश्चिमात्य देशांचीही मदत मिळत आहे. अमेरिकेनं पुन्हा एकदा युक्रेनला मदत जाहीर केलीय. युक्रेनची स्वतःची संरक्षण करण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी यूएस डिपार्टमेंटनं (US Department of Dfense) $300 दशलक्ष सुरक्षा सहाय्य जाहीर केलंय. पेंटागॉनचे प्रेस सचिव (अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्य) जॉन किर्बी (John Kirby) यांनी ही माहिती दिलीय.

यापूर्वी अमेरिकेनं (America) युक्रेनला $500 दशलक्ष अतिरिक्त मदत जाहीर केली होती. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊसचे आभार मानले होते. परंतु, रशियाचे आक्रमण रोखण्यासाठी युक्रेनला आणखी मदत करण्याबाबत आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी बोलण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले होते.

John Kirby
कर्नाटकात आम्ही 150 जागा जिंकू : राहुल गांधी

'रशिया-युक्रेन संघर्षामध्ये युक्रेनला शांतता हवीय. दोन्ही देशांमधील शांततापूर्ण वाटाघाटी कोणताही विलंब न होता केल्या जाव्यात हीच आमची भूमिका आहे,' असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हंटलंय. रशियातील एका खासगी आणि सरकारी नियंत्रणात नसलेल्या माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 'युक्रेनच्या सार्वभौमत्वाठी आम्ही लढत आहोत आणि यापुढंही त्यासाठी लढूच,' असंही झेलेन्स्की म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com