आसाममध्ये अतिरेक्‍यांचा हल्ला;दोन जवान हुतात्मा

पीटीआय
रविवार, 22 जानेवारी 2017

जवान व अतिरेक्‍यांमधील चकमक अद्यापी सुरु आहे. आसाम रायफल्सचे हे वाहन व इतर तीन वाहनांत असलेले पर्यटक भारत म्यानमार सीमारेषेजवळील भागामधून एक सण साजरा करुन परतत होते

गुवाहाटी - आसाम व अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांमधील सीमारेषेजवळ पर्यटकांसमवेत सुरक्षेस्तव असलेल्या आसाम रायफल्सच्या तुकडीवर अतिरेक्‍यांनी चढविलेल्या हल्ल्यांत दोन जवान हुतात्मा झाले.

अन्य काही जवानही या हल्ल्यांत जखमी झाले. आसाममधील तिनसुकिया जिल्ह्याजवळ ही घटना घडली. अतिरेक्‍यांनी या वेळी जवान प्रवास करत असलेल्या वाहनावर ग्रेनेडही फेकल्याचे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यास जवानांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. जवान व अतिरेक्‍यांमधील चकमक अद्यापी सुरु आहे. आसाम रायफल्सचे हे वाहन व इतर तीन वाहनांत असलेले पर्यटक भारत म्यानमार सीमारेषेजवळील भागामधून एक सण साजरा करुन परतत होते.

दरम्यान, अद्यापी चकमक सुरु असल्यामुळे पर्यटक या भागामध्ये अडकले आहेत.

Web Title: Assam Rifles vehicle escorting tourists attacked, 2 jawans killed