esakal | आसाम : ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची टक्कर; एकाचा मृत्यू, ७० बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Assam-boats capsized

आसाम : ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची टक्कर; एकाचा मृत्यू, ७० बेपत्ता

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत प्रवाशांनी भारलेल्या दोन मोठ्या बोटींची एकमेकांना टक्कर झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ७० जण बेपत्ता आहेत. या दोन्ही बोटींमधून एकूण सुमारे १२० लोक प्रवास करत होते. जोरहाट जिल्ह्यातील निमतीघाट येथे ही घटना घडली. NDRF आणि SDRF कडून इथं युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेतून आत्तापर्यंत १०० पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात आलं आहे. या दोन्ही बोटींवर मिळून १२० प्रवाशी प्रवास करत होते. "बुडालेल्या लोकांना वाचवण्यासाठी NDRF आणि SDRF चे कर्मचारी काम करत आहेत," अशी माहिती आसामच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: कोरोनानं झालेल्या मृत्यूंसाठी SCनं नाकारली नुकसान भरपाई; म्हटलं...

यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी सांगितलं की, "या प्रकरणी माजुली आणि जोरहाट प्रशासनाला NDRF आणि SDRFच्या मदतीनं वेगानं बचाव कार्य राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत"

पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख

या बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रवाशांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top