
आसाममध्ये एका महिलेने पतीच्यी हत्या करुन त्याचा मृतदेह घरातच पुरुन ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून घरगुती भांडणातून तिने हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे. ही घटना २६ जून रोजी घडली होती पण आता उघड झाली. मृत व्यक्ती व्यवसायाने भंगार विक्रेता होता.