तपास यंत्रणांच्या कारवाईंचे PM मोदींनी केले समर्थन; घराणेशाहीवरही घणाघात

निकालांतून देशाच्या उज्ज्वल भविष्याची आखणी
तपास यंत्रणांच्या कारवाईंचे PM मोदींनी केले समर्थन; घराणेशाहीवरही घणाघात
तपास यंत्रणांच्या कारवाईंचे PM मोदींनी केले समर्थन; घराणेशाहीवरही घणाघातsakal

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आगामी २५ वर्षांच्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची आखणी करणारे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. नजीकच्या काळात एक ना एक दिवस भारतात घराणेशाहीच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणाचा सूर्यास्त होईल, हे या निवडणुकीतून दिसले आहे, असेही ते म्हणाले. भ्रष्टाचारावर कारवाई केली तर, असे लोक आरडाओरडा करून व एकजूट होऊन तपास करणाऱ्या संस्थांवरच दबाव टाकतात हे देशाचे दुर्दैव आहे, असेही मोदी म्हणाले.

कोरोना निर्मूलन व लसीकरणासारख्या मानवतेच्या कार्यावर काही लोकांनी शंका व्यक्त केल्या. अलीकडे युद्धकाळात जी मुले विदेशात अडकली होती त्यांच्या पालकांचीही या लोकांनी दिशाभूल केली. यांची ही भूमिका भारताच्याच भविष्यासाठीही चिंताजनक बाब आहे, असे सांगून मोदी यांनी भाजप विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, ‘‘भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई केली तर, भ्रष्टाचार हीच ज्यांची ओळख आहे ते तपास संस्थांची बदनामी करत आहेत. या लोकांना देशाच्या न्यायपालिकेवरही भरवसा नाही. आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करा, मग तपासही होऊ देऊ नका ही यांची प्रवृत्तीच बनली आहे. कोणत्याही भ्रष्टाचाऱ्यावर, माफियावर कारवाई होताच त्याला हे लोक धर्माचा, जातीचा रंग देतात, न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या माफियांना हेच लोक जाती धर्माचा रंग देतात. अशा भ्रष्टाचाऱ्यांना, माफियांना आपल्या जाती- धर्मातून दूर करण्याची हिंमत दाखवावी. यामुळे समाज व देश मजबूत होईल.

निवडणूक निकालांत आमच्या भगिनी, माता व मुलींचा मोठा वाटा आहे. त्यांनी जेथे जास्त मतदान केले तेथे तेथे भाजपला बंपर विजय मिळाला आहे व नारी शक्ती ही भाजपच्या विजयाची सारथी आहे, अशीही भावना मोदी यांनी आज व्यक्त केली.

उत्तर प्रदेशाच्या लोकांनी दीर्घकाळ जाती धर्माचे नुकसान सोसल्यावर विकासालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आता ठरविले आहे. या निकालांनी आम्ही आत्मनिर्भरतेचे मिशन पुढील २५ वर्षांत पक्के करू, असे मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशाच्या नागरिकांना जातीयवादाच्या तराजूत तोलून साऱ्या राज्याचा अपमान करणाऱ्या बुद्धिवाद्यांनी व राजकीय ज्ञानी लोकांनी ही बदनामी थांबवावी असा टोला लगावून मोदी म्हणाले, २०१४ पासून याच उत्तर प्रदेशाच्या जनतेने सलग चारदा विकासवादाचे राजकारणच निवडले आहे. गरिबांतील गरीब व्यक्तीनेही विकासालाच मत देऊन दाखविले की जातीचा मान देशासाठी, विकासासाठी झाला पाहिजे, २०१९ मधील भाजपच्या विजयानंतर ज्ञानी लोकांनी, भाजपचा विजय २०१७ मध्येच यूपी निवडणूक विजयानेच निश्चित झाला होता असे म्हटले होते. आता हे बुद्धिजीवी असे मान्य करायची हिंमत दाखवतील का, की भाजपचा २०२२ चा विजय हा २०२४ च्या विजयाचे चिन्ह आहे. घराणेशाही लोकशाहीसाठी धोका आहे व लोकांनी त्याविरूद्ध मतदान करून लोकशाहीची ताकद दाखविली.

भाजप मुख्यालयात जल्लोष

उत्तर प्रदेश व अन्य राज्यातील निकालांचे कल सकाळी दहाच्या सुमारास स्पष्ट होताच भाजप मुख्यालयात ढोल-ताशांसह जल्लोष सुरू झाला. पंतप्रधान सायंकाळी ७.२३ ला भाजप मुख्यालयात आले तेव्हा अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरी तसेच विनोद तावडे आदींनी त्यांचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com