Assembly Election Result : 4 राज्यांच्या निकालानं बदललं देशाचं चित्र! 12 राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत, काँग्रेसच्या हातात उरली फक्त 'इतकी' राज्ये

भारतीय जनता पक्षानं चार पैकी 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमताकडं वाटचाल सुरु केलीये.
Assembly Election Result 2023
Assembly Election Result 2023esakal
Summary

कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये काँग्रेस आता स्वबळावर सत्तेवर येणार आहे.

Assembly Election Result 2023 : भारतीय जनता पक्षानं चार पैकी 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमताकडं वाटचाल सुरु केलीये. या तीन राज्यांत सरकार स्थापन केल्यास, भाजप 12 राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणारा पक्ष ठरणार आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस असणार आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभूत झाल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांची या राज्यांमधील सत्ता गेली आहे. तर, दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापनेसह आम आदमी पक्ष (आप) राष्ट्रीय पक्षांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Assembly Election Result 2023
Rajasthan Assembly Election Results 2023 : गुर्जर समाजाची नाराजी, काँग्रेसला पडली भारी! त्याचवेळी सचिन पायलटांना मुख्यमंत्री केलं असतं तर..?

'या' राज्यांत भाजपची स्वबळावर सत्ता

केंद्रातील सत्ताधारी भाजप उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तेवर असून मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज भाजपनं मुसंडी मारली आहे. तर, काँग्रेसकडून छत्तीसगड हिसकावून घेतलं आहे. याशिवाय भाजप महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांतील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.

Assembly Election Result 2023
Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थानात मुख्यमंत्री शिंदेंच्या एकमेव उमेदवारानं काँग्रेस-भाजपला फोडला घाम, किती घेतलं मतदान?

'या' राज्यांमध्येच काँग्रेसचं सरकार

कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये काँग्रेस आता स्वबळावर सत्तेवर येणार आहे. तेलंगणात, काँग्रेस आपल्या जवळच्या प्रतिस्पर्धी सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव करून विजयाच्या मार्गावर आहे. हा पक्ष बिहार आणि झारखंडमधील सत्ताधारी आघाडीचा देखील भाग आहे. या निकालांनी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपची स्थिती मजबूत केली आहे. काँग्रेसला फटका बसल्यामुळे दोन राज्यांत सरकार असलेला आप हा दुसरा सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला आहे.

सध्या भारतात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत. - भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (BSP), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI-M), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि आप (AAP). विधानसभा निवडणुकीची पुढील फेरी 2024 मध्ये होणार आहे. यात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये निवडणुका होतील. तर, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकाही प्रलंबित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com