उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये मतदानाला सुरवात

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

उत्तराखंडमध्ये 74 लाख 20 हजार मतदार 628 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. दरम्यान, कर्णप्रयाग या मतदारसंघातील बसपचे उमेदवार कुलदीप सिंह कनवासी यांचा अपघाती मृत्यू झाल्याने येथील निवडणूक तात्पुर्ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लखनौ/डेहराडून - उत्तराखंड विधानसभेच्या 69 मतदारसंघात बुधवार (आज) सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली असून, उत्तर प्रदेशमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे.

उत्तराखंडमध्ये 74 लाख 20 हजार मतदार 628 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. दरम्यान, कर्णप्रयाग या मतदारसंघातील बसपचे उमेदवार कुलदीप सिंह कनवासी यांचा अपघाती मृत्यू झाल्याने येथील निवडणूक तात्पुर्ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. माओवाद्यांनी दिलेली धमकी तसेच, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत असून, त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या टप्प्यात पश्‍चिमेकडील 67 मतदारसंघाचा समावेश असून, मतदानासाठी 14 हजार 771 मतदान केंद्रे व 23 हजार 693 बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात तब्बल 720 उमेदवार रिंगणात आहेत. गतवेळच्या निवडणुकीत सर्व जिल्ह्यांत समाजवादी पक्षाने बाजी मारली होती. त्या वेळी बसपला 18 तर, भाजपला 10 जागांवर आपले उमेदवार निवडून आणता आले होते.

Web Title: Assembly Elections 2017 Voting begins in Uttarakhand and Uttar Pradesh