Atal Bihari Vajpayee Untold Stories : भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. या देशाने आजवर अनेक नेते बघितले, अनेक पंतप्रधान बघितले. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांचा विचार केला, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकावेळी अनेक गुण दिसतात. एक कवी, उत्कृष्ट वक्ता आणि महान नेता, अशी त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पाच खास किस्से जाणून घेऊया...