esakal | दूरदर्शी नेतृत्वाने देशाला नेलं अभूतपूर्व उंचीवर; वाजपेयींच्या जयंतीनिमित्त PM मोदींनी केलं नमन
sakal

बोलून बातमी शोधा

atal bihari vajpeyee

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे.

दूरदर्शी नेतृत्वाने देशाला नेलं अभूतपूर्व उंचीवर; वाजपेयींच्या जयंतीनिमित्त PM मोदींनी केलं नमन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज ते संसद भवनात एक पुस्तक प्रकाशित करणार आहेत. भारत सरकार आणि भारतीय जनता पक्ष देशाच्या अनेक भागात हा कार्यक्रम साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्या आठवणी जागवत म्हटलं की, आपल्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये त्यांनी देशाच्या विकासाला अभूतपूर्व उंचीवर नेलं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना विचारधारा आणि सिद्धांतांवर आधारित राजकारण करणारा व्यक्ती असं म्हटलं.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी 9 कोटी खात्यावर पाठवणार 2 हजार रुपये
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या जन्म जयंतीवर शत-शत नमन. आपल्या दूरदर्शी नेतृत्वात त्यांनी देशाला विकासाच्या अभूतपूर्व उंचीवर  पोहोचवले आहे. एक सशक्त आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी त्यांच्या प्रयत्नांना सातत्याने उजाळा दिला जाईल.

अमित शहा यांनीही केलं नमन
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त म्हटलं की, विचारधारा आणि सिद्धांतावर आधारित राजकारण तसेच राष्ट्राला समर्पित जीवनाने भारतात विकास, गरीब कल्याण आणि सुशासनाच्या युगाची सुरवात करणाऱ्या भारतरत्न आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन. अटलजींची कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवा आपल्यासाठी सदैव प्रेरणा देत राहिल.

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी साधतील संवाद
अटल जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 6  राज्यांतील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ते आज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18 कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत. या दरम्यान केंद्रीय मंत्री देशाच्या वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांच्या सोबत उपस्थित असतील. 
 

loading image
go to top