esakal | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी 9 कोटी खात्यावर पाठवणार 2 हजार रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

पंतप्रधान मोदी बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करणार आहेत. भाजपने हा कार्यक्रम एका उत्सवासारखा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी 9 कोटी खात्यावर पाठवणार 2 हजार रुपये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता आज जारी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मोदी आज जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर 18 हजार कोटी रुपये पाठवणार आहेत. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान सहा राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पीएम किसान आणि केंद्र सरकारच्या इतर कृषी कल्याण योजनेंबाबत मोदी शेतकऱ्यांना अनुभव सांगणार आहेत. 

पीएस किसान योजनेचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान मोदी बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करणार आहेत. भाजपने हा कार्यक्रम एका उत्सवासारखा साजरा करण्याचा निर्णय घेतला असून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक कोटी शेतकरी सहभागी होतील असं म्हटलं जात आहे.

हे वाचा - कृषी कायदे रद्दच करा; राहुल गांधींची मागणी

पीएम किसान योजनेंतर्गत दर वर्षाला तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 6 हजार रुपये पाठवले जातात. 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम खात्यावर पाठवली जाते. सध्या दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना एका कार्यक्रमाच्या माध्यमातून आताचा 2 हजार रुपयांचा हप्ता पाठवला जात आहे. गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. सरकारने हे तीनही कायदे मागे घ्यावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. तर हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून गुरुवारी माहिती दिली की, उद्याचा दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे. यावेळी काही राज्यातील शेतकऱ्यांशी संवादस साधणार असल्याचंही मोदींनी सांगितलं होतं. 

नव्या वर्षापासून गाड्यांना FASTag बंधनकारक; नितीन गडकरींची घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मेहरौली इथं आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह द्वारका सेक्टर 15 मध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांची माहिती देताना राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, देशातील शेतकरी पंतप्रधान मोदींसोबत आहेत. त्यांना विश्वास आहे की शेती आणि शेतकऱ्यांचं चांगलं कोण करू शकतं तर ते पंतप्रधान मोदीच करू शकतात. 

loading image
go to top