

Former Prime Minister Atal Bihari Vajpayee during his historic Pakistan visit, remembered for his sharp wit, diplomatic wisdom, and iconic responses.
esakal
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज १०१ वी जयंती आहे. ते केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय होते. पाकिस्तानमध्येही त्यांचे हजारो चाहते होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अटलजींचे स्मरण करताना लखनौमध्ये एक मनोरंजक किस्सा सांगितला. पंतप्रधान असताना अटलजींच्या पाकिस्तान भेटीचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की त्यांचे व्यक्तिमत्व इतके विशाल होते की संपूर्ण जग त्यांच्या कार्यनीती आणि निर्णयांचे कौतुक करत असे.