सोशल मीडियावर वाजपेयी यांच्या निधनाची अफवा व्हायरल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर आज (शुक्रवार) व्हायरल झाले. या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी अनेकजण वृत्तवाहिन्यांचा आधार घेत होते. मात्र, या वृत्ताची सत्यता पडताळल्यानंतर ही अफवा असल्याचे उघड झाले.

सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवरून हे वृत्त व्हायरल झाले. मात्र, या वृत्ताची सत्यता पडताळल्यानंतर ही अफवा असल्याचे उघड झाले. मात्र, काहीजण खातरजमा न करता श्रद्धांजली वाहत होत. या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे भारतीय जनता पक्षाने सांगितले आहे. यापूर्वीही 2015 पासून दोन ते तीन वेळा अशाच प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, यापूर्वी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर स्थानिकांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार नोंदवली होती. यानंतर जिल्हाधिका-यांनी शाळेचे प्राध्यापक कमलकांत दास यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली.

गेल्या काही वर्षांपासून 93 वर्षीय वाजपेयी आजारी आहेत. अशातच वारंवार त्यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र, या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिवाय, खात्री केल्याशिवाय असे मेसेज पाठवू नका फॉरवर्ड करू नका, असेही भाजपाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

Web Title: Atal Bihari Vajpayee's death reports are going viral on social media