

80th Independence Day: PM Modi to Hoist National Flag at Red Fort
esakal
सुट्टीचा दिवस असल्याने छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद मार्गावर आज मोठी वाहतूक कोंडी झाली. घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक आणि भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, आमदार प्रशांत बंब यांनी परिस्थितीची पाहणी करत थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. वाहनचालकांना योग्य दिशेने जाण्याच्या सूचना देत त्यांनी काही काळ स्वतः वाहतूक नियमन केले. सुट्टीच्या दिवशी खुलताबादमध्ये होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.