Sugarcane Harvester Accident
esakal
देश
ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...
Tragic Sugarcane Harvesting Accident in Athani : अथणी तालुक्यातील सप्तसागर येथे उसतोडणीदरम्यान मशीनमध्ये अडकून ५४ वर्षीय शेतकरी महिला शोभा संक्रट्टी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अथणी : स्वतःच्या शेतात उसाची तोडणी सुरू असताना ऊसतोडणी मशीनमध्ये सापडून शेतकरी महिलेचा मृत्यू (Sugarcane Harvester Accident) झाल्याची हृदयविदारक घटना गुरुवारी (ता. २०) अथणी तालुक्यातील सप्तसागर येथे घडली. शोभा श्रीकांत संक्रट्टी (वय ५४) असे ऊसतोडणी मशीनमध्ये सापडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
