अॅट्रॉसिटीबाबतच्या फेरबदलाच्या स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

केंद्र सरकारने अॅट्रॉसिटीबाबतच्या फेरबदलास स्थगिती देण्यासाठी केलेल्या याचिकेवर आज (मंगळवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान बदलाला स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल तूर्त कायम राहणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अॅट्रॉसिटीबाबतच्या फेरबदलास स्थगिती देण्यासाठी केलेल्या याचिकेवर आज (मंगळवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान बदलाला स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल तूर्त कायम राहणार आहे.
 
अॅट्रॉसिटी कायद्यात केंद्र सरकारने केलेले बदल रद्द करण्याबाबत फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती यू यू लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच या याचिकेवर पुढील सुनावणी 10 दिवसांत होणार असून, विविध राजकीय पक्षांसह पक्षकारांना 3 दिवसांत लेखी बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

Web Title: Atrocity Act Changes Stay Supreme Court Refuses