बाबुल सुप्रियोंच्या ताफ्यावर हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

कोलकाता - केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर आज हल्ला झाला. पश्‍चिम बंगालमधील आसनसोल गावात एका मोर्चात सामील होण्यास आलेल्या सुप्रियो यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये गर्दीतून भिरकावलेल्या एका विटेचा छातीवर मार लागून ते किरकोळ जखमी झाल्याचेही समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी झालेल्या दगडफेकीत त्यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली, तसेच मारहाणीचे प्रकारही घडले. या कार्यकर्त्यांनी इतरही अनेक गाड्यांचे नुकसान केले.

हल्ला करणारे तृणमूल कॉंग्रेसचेच गुंड होते व नेते मलय घटक यांचे कार्यकर्ते होते. त्यांनी आमच्यावर दगडफेक केली आणि गाड्याही फोडल्या. परंतु पोलिसांनी भाजपच्याच समर्थकांना अटक केली आहे.
- बाबुल सुप्रियो, खासदार

Web Title: attack on babul supriyo convoy