जादूटोण्यासाठी काकूने केली आपल्याच भाचीची हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

जादुटोण्याच्या आहारी जाऊन काकूने आपल्याच भाचीची हत्या केल्याची घटना हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यात घडली

चंदीगड (यमुनानगर) - जादुटोण्याच्या आहारी जाऊन काकूने आपल्याच भाचीची हत्या केल्याची घटना हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यात घडली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. आंबाला येथील रहिवाशी आरोपी नरींदर कौर हिने आपल्या गुन्ह्याबद्दल पोलिसांना कबुली देताना असे म्हटले आहे की, ती काळ्या जादूटोण्याचा सराव करत असताना तिचा काही आत्म्यांशी संपर्क झाला. त्यात त्यांनी छोट्या मुलीच्या बलिदानाची मागणी केली नाहीतर माझ्या पतीच्या जीवाला धोका होता. म्हणून तिने तिच्या भाचीची हत्या केली. 

जगधरी परिसरात वास्तव्यास असणारे मृत बाळाचे वडील हे त्यांच्या राहत्या घरी इतर सदस्यासोबत अंगणात बसले होते तर, आई घरात स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. त्यावेळी, मुले ही घरात खेळत होती, नरिंदरने घरात जाऊन त्या बाळाच्या गळ्यावर वार केला. असे या प्रकरणाचा तपास करत असलेले अधिकारी नविन कुमार यांनी सांगितले आहे. 

बाळाच्या रडण्याचा आवाज आला म्हणून बाळाच्या आईने पाहिले असता, आरोपी नरिंदर ही त्यावेळी तिथेच उभी होती तिच्या हातात चाकू होता त्याला रक्त लागलेले होते. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 
 

Web Title: Aunt kills three year old niece in Haryana

टॅग्स