Gujarat: केजरीवालांनी ज्याच्या घरी जेवण केलं, तो रिक्षावाला म्हणतोय, मी मोदींचा आशिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

Gujarat: केजरीवालांनी ज्याच्या घरी जेवण केलं, तो रिक्षावाला म्हणतोय, मी मोदींचा आशिक

नवी दिल्ली - गुजरात दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १२ सप्टेंबर रोजी एका रिक्षाचालकाच्या घरी जेवण केलं होतं. मात्र आता त्या रिक्षाचालकाने यूटर्न घेत आपण मोदींचाच चाहता असल्याचं म्हटलं आहे. (Arvind kejriwal news in Marathi)

हेही वाचा: Chandrakant Patil रिटायर होणार, निवृत्तीचे संकेत

विक्रम दंतानी असं त्या रिक्षा चालकाचे नाव असून तो म्हणाला की, मला रिक्षा युनियनच्या वतीने केजरीवाल यांना जेवणासाठी आमंत्रित करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर मी केजरीवाल यांना आमंत्रित केलं, जेवू घातलं आणि पाठवून दिल्याचं दंतानीने सांगितलं.

विक्रम दंतानीने म्हटलं, आमच्या ग्रुपमध्ये मेसेज आला आणि मला त्यांना जेवणासाठी आमंत्रित करण्यास सांगण्यात आले. मी सुरुवातीपासून भाजपशी संबंधित आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मतदान केलं, तेव्हापासून मी भाजपशी संबंधित आहे. मी सुरुवातीपासूनच मोदीजींचा चाहता आहे.

हेही वाचा: Mohit Kamboj: राष्ट्रवादीचं नाव घेत,मोहीत कंबोजांचा उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान यावरून एवढं राजकारण होईल हे माहीत नव्हतं, असं ऑटोचालक दंतानीने सांगितलं. तो म्हणाला, “मी त्यांना एका सामान्य नागरिकाप्रमाणे जेवायला बोलावले होते. यावर ते इतके राजकारण करतील हे मला माहीत नव्हते. जेवण केल्यानंतर आम आदमी पक्षाचा एकही सदस्य दिसला नाही. आम्ही मोदी साहेबांचे चाहते आहोत आणि त्यांना नेहमी मतदान करतो.