esakal | अदानी, नाडर यांना मागे टाकत 'हे' बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

अदानी, नाडर यांना मागे टाकत 'हे' बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती

अदानी, नाडर यांना मागे टाकत 'हे' बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी, शिव नाडर या उद्योगपतींना मागे टाकत आता डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी हे श्रीमंतीत पुढे दिसत आहे. राधाकिशन दमानी हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. दमानी यांची संपत्ती आता सुमारे 1,25,000 कोटी (17.5 अब्ज डॉलर) रुपये झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती 57.4 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांच्यानंतर आता राधाकिशन दमानी यांचा क्रमांक येत आहे. दमानी हे शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. मागील आठवड्यात ऍव्ह्येन्यू सुपरमार्केटचे शेअर्स 5 टक्के वाढले होते. त्यामुळे दमानी यांच्या संपत्तीत वाढ झाली, अशी माहिती फोर्ब्स रिअल टाइम बिलिनिअरीज इंडेक्सने दिली आहे.

कोरोनाचे पाप चीनचेच, चीनी संशोधकांचा दावा

दमानी यांच्यानंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे शिव नाडर, उदय कोटक आणि गौतम अदानी यांचा क्रमांक येतो.