

Bird Flu Avian Influenza
ESakal
केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा (बर्ड फ्लू) पसरल्यानंतर निलगिरी जिल्हा प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संसर्गाच्या धोक्यामुळे केरळमधून निलगिरीमध्ये कोंबड्या आणि सर्व पोल्ट्री उत्पादनांच्या आयातीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. निलगिरी जिल्ह्यात हा आजार पसरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.