esakal | आएशाच्या समोरच पती मारायचा गर्लफ्रेंडशी गप्पा; डिप्रेशनमध्ये गमावलं बाळ

बोलून बातमी शोधा

Ayesha_Khan}

एकदा आरिफने आएशाला तिच्या आई-वडिलांकडे अहमदाबादला सोडले होते. तेव्हा ती गर्भवती होती.

आएशाच्या समोरच पती मारायचा गर्लफ्रेंडशी गप्पा; डिप्रेशनमध्ये गमावलं बाळ
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अहमदाबाद : येथील २३ वर्षीय आएशा खान या मुलीनं साबरमती नदीत उडी मारत आत्महत्या केली. शनिवारी ही घटना घडली, पण हसत हसत मरणाला कवटाळणाऱ्या आएशाने आत्महत्या करण्याआधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती दु:ख असू शकतं यावरील पडदा आता उठला आहे. आएशाच्या हसण्यामागील वेदना वकीलांच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. 

आएशाचे वकील जफर पठाण यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. २३ वर्षीय आएशाचे राजस्थानातील जालौर येथे राहणाऱ्या आरिफ खानशी लग्न झाले होते, पण लग्नानंतरही आरिफचे राजस्थानातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. आरिफ आएशाच्यासमोरच व्हिडिओ कॉलवर गर्लफ्रेंडशी बोलत असायचा. आणि आरिफ त्याच्या मैत्रिणीवर पैसे खर्च करायचा. यासाठी तो आएशाच्या वडिलांकडून पैशांची मागणी करत असे, आणि आएशालाही त्रास देत असे, असे वकील पठाण यांनी सांगितले. 

रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला; 'पेट्रोल-डिझेल दरवाढ आटोक्यात आणायचीय तर...'​

लग्नाच्या दुसऱ्या महिन्यानंतरच सुरू झाला त्रास
साबरमती नदीच्या पूलावरील आएशाच्या शेवटच्या व्हिडिओने लोकांना हैराण करून सोडलं आहे. तिला होत असलेल्या त्रासाबाबत ती व्हिडिओमध्ये जास्त काही बोलली नाही, पण लग्नाच्या २ महिन्यानंतर आएशाचा संघर्ष सुरू झाला होता. माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, ही गोष्ट आरिफने आएशाला सांगितली होती. हे समजल्यानंतरही आएशा आपल्या गरीब आई-वडिलांचा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी सगळं सहन करत राहिली. कितीही त्रास झाला तरीदेखील ती गप्प राहिली. नवरा त्याच्या बायकोसमोर गर्लफ्रेंडशी बोलत असेल, या गोष्टीपेक्षा वाईट आणखी काय असू शकते.

शेवटपर्यंत तिने त्रास सहन केला
आएशा एक हुशार मुलगी होती. अभ्यासाव्यतिरिक्त ती घरातील कामांतही हुशार होती. लहानपणापासूनच तिने घरच्या जबाबदाऱ्या हाताळल्या होत्या. त्यामुळे सासरी तिला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून ती शेवटपर्यंत त्रास सहन करत राहिली. आएशाच्या वडिलांनी तिला सर्व संसारोपयोगी गोष्टी लग्नावेळी दिल्या होत्या. पण तरीही आएशाचा पती आणि सासू-सासरे समाधानी नव्हते. 

VIDEO - पुणे पोलिस म्हणतात,'तुम्ही रोनाल्डो असलात तरी मास्क बंधनकारकच'​

नैराश्यात गमावलं बाळ
एकदा आरिफने आएशाला तिच्या आई-वडिलांकडे अहमदाबादला सोडले होते. तेव्हा ती गर्भवती होती. तुम्ही मला दीड लाख रुपये दिले तर मी आएशाला घेऊन जाईल, असं आरिफ म्हणाला होता. त्यामुळे गर्भवती असलेल्या आएशाला नैराश्याने ग्रासलं होतं. यादरम्यान बराच रक्तस्त्राव (ब्लिडिंग) होऊ लागला होता. डॉक्टरांनी तिला तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. या सगळ्यात तिच्या गर्भात असेलल्या बाळाला वाचवता आलं नाही. या घटनेनंतरही आरिफच्या घरच्यांवर काही परिणाम झाला नाही, त्यांच्याकडून पैशांची मागणी होतच राहिली, असं आएशाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. 

आरिफला शिक्षा झालीच पाहिजे
आएशाचे वडील लियाकत अली यांनी घडल्या प्रकाराची माहिती देण्यासाठी आरिफच्या वडिलांना फोन केला, पण त्यांनी कधीच फोन उचलला नाही. माझी आएशा कधीच परत येणार नाही, त्यामुळे तिच्या अपराध्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जेणेकरून दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत असा प्रकार घडू नये. सतत हसरा चेहरा असणाऱ्या माझ्या मुलीचा हुंड्यासाठी बळी गेला. तिच्या सासरच्यांनी तिला तीन दिवस जेवणही दिले नव्हते. आएशाचे आयुष्य नरक बनले होते, असेही लियाकत यांनी म्हटले आहे. 

आएशाचा शेवटचा कॉल होतोय व्हायरल; नवरा म्हणाला 'जीव देतानाचा व्हिडिओ पाठवून दे'!​

आयशाच्या पतीला पाली येथे अटक
दरम्यान, गुजरात पोलिसांनी या घटनेची दखल घेत जालौर गाठले. पोलिस जेव्हा आरिफच्या घरी पोहोचले होते, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी तो एका लग्नानिमित्त बाहेर गेला असल्याचे सांगितले. यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे आरिफला पाली येथून अटक करण्यात आली.

आएशाच्या या व्हिडिओनं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)