
अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी बुधवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची तुफान गर्दी दिसून आली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच दोन लाख भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर बुधवारी १ जानेवारीला अर्थात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या संख्येत आणखी भर पडून सुमारे ३ लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच सूर्योदयावेळी रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये हा उत्साह दिसून आला.