Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या दर्शनाची ओढ अनिवार; कुणी सायकलवर, तर कुणी अनवाणी येणार

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी काही भाविक हे पायी, काही सायकलवर तर काही चक्क स्केटिंग करत अयोध्येमध्ये दाखल झाले.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSakal

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी काही भाविक हे पायी, काही सायकलवर तर काही चक्क स्केटिंग करत अयोध्येमध्ये दाखल झाले. वाटेत येणाऱ्या अडचणी आणि थंडी वाऱ्याची तमा न बाळगता मैलोन्‌मैल प्रवास करत हे भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत.

बिहारमधील मधेपूर जिल्ह्यातील नितीशकुमार हे सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करत अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. ‘‘बिहारमधून सायकलवर अयोध्येमध्ये येण्यासाठी मला सात दिवस लागले, मी केवळ जीवनावश्‍यक वस्तू घेऊन निघालो होतो.

जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबाबतचा निकाल दिला होता, तेव्हाच मी अयोध्येत मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला होता,’’ असे नितीश यांनी सांगितले.

स्केटिंगमध्ये जागतिक विक्रम करणाऱ्या सोनी चौरसिया या वाराणसीहून स्केटिंग करत अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत. सोनी म्हणाल्या, ‘‘मी १७ जानेवारीला घरातून निघाले आहे. येथून अयोध्येपर्यंतचे अंतर २२८ किलोमीटर आहे.

यापूर्वी देखील मी स्केटिंग करत असे दीर्घ पल्ल्याचे प्रवास केलेले आहेत, मात्र यावेळी वातावरणात सातत्याने सतत बदल होत असल्याने हा प्रवास आव्हानात्मक आहे.’’

राजस्थानमधील कोटपुतली येथून हिमांशू सोनी हा अवघ्या दहा वर्षांचा मुलगा देखील ७०४ किलोमीटर स्केटिंग करत अयोध्येमध्ये दाखल होणार आहे. छत्तीसगडमधील खरसिया येथील रहिवासी नरेश गुप्ता हे सुमारे ७०० किलोमीटर अनवाणी चालत अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com