

Ayodhya's Unique Educational Initiative
Sakal
'Ram-Ram' as a Disciplinary Measure: अयोध्या: मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या पावन नगरीतून, अयोध्येतून, शिक्षण आणि संस्काराचा एक अद्भुत संदेश जगासमोर आला आहे. अयोध्या येथील राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेज प्रशासनाने घेतलेल्या एका अनोख्या निर्णयामुळे देशभर चर्चा सुरू झाली आहे.
आता या कॉलेजमध्ये चूक करणाऱ्या विद्यार्थ्यांना ना ओरडा मिळणार, ना कोणती कठोर शिक्षा. त्याऐवजी, त्यांना त्यांच्या वहीत 'राम-राम' लिहायला लागणार आहे. अयोध्यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रात शिक्षण आणि अध्यात्माचा हा संगम भारतीय शिक्षण परंपरेतील मूल्यांना पुनर्जीवित करण्याच्या दिशेने एक प्रेरणादायक पाऊल मानला जात आहे.