अयोध्येची राजकुमारी 2 हजार वर्षांपूर्वी कोरियाला गेली, तिथल्या राजाशी लग्न केलं; अयोध्येत भव्य पुतळ्याचं अनावरण

ayodhya queen suri ratna अयोध्येची राजकुमारी सूरी रत्ना (क्वीन हो) यांच्या भव्य अशा पुतळ्याचं अयोध्येतील इंडो कोरियन पार्कमध्ये अनावरण करण्यात आलं. १२ फूट उंच असा हा कांस्य पुतळा आहे.
Ancient Ayodhya Korea Link Revived With Queen Suri Ratna Statue

Ancient Ayodhya Korea Link Revived With Queen Suri Ratna Statue

Esakal

Updated on

अयोध्येत शरयू नदीच्या काठावर असलेल्या इंडो कोरियन पार्कमध्ये दक्षिण कोरियाची महाराणी सूरी रत्ना (क्वीन हो) यांच्या भव्य अशा कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. महापौर गिरीश त्रिपाठी यांनी पुतळ्याच्या अनावरणावेळी म्हटलं की, ही ऐतिहासिक संधी असून भारत आणि दक्षिण कोरियातील २ हजार वर्षे जुन्या सांस्कृतिक संबंधांना आणखी दृढ करणारी ही घटना आहे. या कार्यक्रमात कोरियाचे शिष्टमंडळही सहभागी होणार होते. मात्र दाट धुक्यामुळे विमान उड्डाण रद्द झाल्यानं शिष्टमंडळ पोहोचू शकले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com