RSS Reacts to Ayodhya Ram Mandir Donation Theft Case
esakal
Ayodhya Ram Mandir Case: राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच अधिकृत भूमिका मांडली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी याबाबत बोलताना दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्रीराम जन्मभूमीवर उभारलेले भव्य मंदिर हे पिढ्यानपिढ्यांच्या संघर्ष, त्याग आणि कोट्यवधी रामभक्तांच्या समर्पणाचे प्रतीक आहे. त्यामुळे मंदिरातील गैरव्यवहारामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेला धक्का बसला असून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.