Ayodhya Ram Mandir : नेपाळमधील जनकपूरला लागले प्राणप्रतिष्ठेचे वेध

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जनकपूर येथे साफसफाई मोहीम राबविली जात आहे.
ayodhya ram mandir nepal janakpur devotee pran pratishtha birth place of sita
ayodhya ram mandir nepal janakpur devotee pran pratishtha birth place of sitaSakal

काठमांडू : नेपाळमधील भाविकांत प्राणप्रतिष्ठेवरून विशेष उत्सुकता आहे. नेपाळमधील जनकपूर हे सीतेचे जन्मठिकाण मानले जाते. जनकपूर हे अयोध्येपासून सुमारे पाचशे किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जनकपूर येथे साफसफाई मोहीम राबविली जात आहे.

शहरातील सर्व घरे सजविण्यात आले असून ठिकठिकाणी झेंडे, बॅनर आणि रंगबिरंगी दिवे लावण्यात आले आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून २२ तारखेला शोभा यात्रा, पारंपरिक पूजा, दीप प्रज्वलन, प्रसाद वितरण आणि मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

जनकपूर हे उभय देशांतील अतूट संबंधांचे प्रतीक राहिले आहे. मधेस प्रांतातील हॉटेल असोसिएशन ऑफ नेपाळ (एचएएन) चे अध्यक्ष विजया झुनझुनवाला म्हणाले, हा खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आम्ही सर्वजण उत्साहाने या क्षणाची वाट पाहत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com