

Ayodhya Ram Mandir
esakal
अयोध्या: श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची महत्त्वाची बैठक सोमवारी (ता.६) ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या ‘मणी रामदास छावणी’ या आश्रमामध्ये होणार आहे. या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. मंदिरातील चोरीबाबतचा विशेष चौकशी समितीचा (एसआयटी) अहवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची निर्मिती आदी विषयांवर या बैठकीमध्ये मंथन होईल.