esakal | Ayodhya Vardict : अयोध्येतील जागेचा वाद नेमका कधीपासून सुरू झाला? वाचा इतिहास 
sakal

बोलून बातमी शोधा

ayodhya verdict how and when dispute started in ayodhyaq

Ayodhya Vardict : अयोध्येतील जागेचा वाद नेमका कधीपासून सुरू झाला? वाचा इतिहास 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अयोध्येतील बाबरी मशिद 1992 मध्ये जमीनदोस्त झाली. अनेकांना त्याघटनेनंतरच राम जन्मभूमीचा वाद उफाळून आल्याचा गैरसमज आहे. पण, त्याआधी आणि त्यानंतरही त्या जागेवरून दोन समाजात मतभेद राहिल्याने न्यायालयात वाद गेला. बाबरी मशिद उध्वस्त होण्यापूर्वी कसा सुरू झाला वाद? 

आता तरी राजकारणासाठी रामाचा वापर थांबेल : काँग्रेस

आज बाळासाहेब असते तर, राज ठाकरेंना झाली आठवण 

अयोध्या शहरातील मंदिर की मशिद ही लढाई 1853 पासून सुरू झाली. त्यावरून हिंसाचाराच्या घटना सुरू झाल्या. देशात इंग्रजांनी शिरकाव केला होता. पण, अवध साम्राज्याच्या गादीवर त्या वेळी नबाब वाजिद अली शाह होता. 

न्यायालयात बाजू मांडत होता रामाचा नेक्स्ट फ्रेंड 

वादाचा घटनाक्रम

 1. 1528 - मुघल सम्राट बाबर याचा सेनापती मीर बागी याने अयोध्येत बाबरी मशीद उभारली.
 2. 1853 - हिंदूंचे मंदिर पाडून बाबराच्या काळात तेथे मशिद बांधली, असा दावा करत निर्मोही आखाड्याने (पंथियांनी) जागेवर हक्क सांगितला 
 3. 1859 - ब्रिटिश वसाहत प्रशासनाने वादग्रस्त जागेवर कुंपण घालून दोन भाग केले. अंतर्गत भाग मुस्लिम, तर बाह्य भाग हिंदूंना वापरण्यास परवानगी.
 4. 1885 - जानेवारीत महंत रघुवीर दास यांनी फैजाबादच्या जिल्हा न्यायालयात मशिदीबाहेरील रामचबुतरा येथे छत उभारण्यास परवानगी मागितली, ती नाकारली गेली.
 5. 1949 - श्रीरामांची मूर्ती मशिदीमध्ये आढळल्या. हिंदूंनीच त्या ठेवल्याचा दावा केला गेला. दोन्हीही बाजूंनी न्यायालयात दावे दाखल केले. सरकारने त्या जागेला वादग्रस्त जाहीर करून त्याच्या प्रवेशद्वाराला कुंपण घातले.
 6. 1950 - श्रीरामांच्या जन्मस्थानी असलेल्या मूर्तीच्या पूजेसाठी परवानगी मागणारा गोपालसिंग विसराद आणि महंत परमहंस रामचंद्र दास यांचा अर्ज फैजाबाद न्यायालयात दाखल. त्याला परवानगी मिळाली, मात्र अंतर्गत भाग कुलूपबंदच राहिला.
 7. 1959 - रामजन्मभूमीचे आपणच ताबेदार आहोत. त्यामुळे त्याचा ताबा आपणांस मिळावा, अशी मागणी करणारा तिसरा अर्ज निर्मोही आखाड्याकडून दाखल.
 8. 1961 - मशिदीत मूर्ती ठेवण्यास विरोध करत मशिद आणि त्याचा परिसर कब्रस्तान असल्याचा दावा करणारा अर्ज सुन्नी मध्यवर्ती वक्‍फ बोर्डाकडून सादर.
 9. 1984 - जन्मभूमीच्या ठिकाणी राममंदिर बांधण्याच्या प्रक्रियेला वेग, हिंदू संघटनांकडून त्यासाठी समितीची स्थापना. त्याचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानींनी स्वीकारले.
 10. 1986 - मशिदीची प्रवेशद्वारे खुली करावीत आणि हिंदूंना पूजेला परवानगी द्यावी, असा आदेश हरी शंकर दुबे यांच्या अर्जावर न्यायालयाने दिला. मुस्लिमांनी निषेध नोंदवला. त्यानंतर बाबरी मशिदी कृती समितीची स्थापना.
 11. 1989 - बाबरी मशिदीजवळ विश्‍व हिंदू परिषदेकडून राममंदिरासाठी शिलान्यास. विश्‍व हिंदू परिषदेचे माजी उपाध्यक्ष न्या. देवकीनंदन अगरवाल यांनी मशिद अन्यत्र हलवण्यासाठी दावा दाखल केला. फैजाबाद न्यायालयासमोरील चार खटले उच्च न्यायालयाच्या खास पीठासमोर नेण्यात आले.