कोरोनावरील उपचाराची नवी उमेद; भारतात सुरु झाला हा प्रयोग

टीम ई-सकाळ
Tuesday, 9 June 2020

भारतात आता कोरोना विषाणूवरील उपचारासाठी इम्युनिटी बूस्टर थेरिपीचा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. आयुर्वेदिक, यूनीनी आणि होमिओपॅथी औषधे बनवणाऱ्या कंपन्या एकत्रितपणे यावर काम करत आहेत. 

कोरोनाच्या उपचाराची नवी उमेद; भारतात सुरु झाला हा प्रयोग
नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूसमोर सर्व राष्ट्रे हतबल झाली आहेत. या महा साथीच्या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने देशव्यापी लॉकडाउनसारख्या निर्णयातून सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी महा साथीच्या रोगावर लस शोधण्याचेही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जोपर्यंत लसीचा शोध लागत नाही तोपर्यंत हे संकटातून आपण कायमचे मुक्त होणार नाही, याची कल्पना आता जगातील सर्वच राष्ट्रांना आली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देश कोरोनाचा खात्मा करण्यास उपयुक्त ठरेल अशी लस शोधत आहेत. 

हा देश झाला कोरोनामुक्त; कोणता ते वाचा

भारतात आता कोरोना विषाणूवरील उपचारासाठी इम्युनिटी बूस्टर थेरिपीचा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. आयुर्वेदिक, यूनीनी आणि होमिओपॅथी औषधे बनवणाऱ्या कंपन्यांनी एकत्रित मिळून हा प्रयोग हाती घेतलाय.  आयुष मंत्रालयाने अश्‍वगंधा, यष्टिमधु, गुडचि आणि पिप्‍पली यासारख्या औषधी वनस्पतीच्या माध्यमातून पॉली हर्बल फॉर्म्‍युलेशन (Aayush-64) संदर्भात  रिसर्च  प्रोटोकॉल विकसित केलाय. 

कोरोनाला रोखणारे तैवानी मॉडेल

इम्‍युनिटी बूस्‍टर औषधाच्या निर्मितीसाठी हमदर्द लॅबोरेट्रीज, डाबर, श्री श्री तत्‍व यासारख्या ग्राहक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी प्रयोगासंदर्भात आपल्या कंपनीची नोंदणी देखील केली आहे. हमदर्द लॅबोरेट्रीजने यूनानी चिकित्‍सा पद्धतीच्या आधारावर  इम्‍युनिटी बूस्‍टर उत्पादनाची ट्रायल सुरु केली आहे.  क्लिनिकल ट्रायल एसिम्‍प्‍टोमेटिक आणि कोरोनाच्या संशयित रुग्णांवर या औषधाचा प्रयोग केला जाणार आहे. आध्‍यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची आयुर्वेदिक कंपनी श्री श्री तत्‍व या कंपनीने बंगळुरु मेडिकल कॉलेज अँण्ड रिसर्च इंस्‍टीट्यूटसोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनी 50 एसिम्‍प्‍टोमेटिक आणि कोरोनाची हलकी लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर  इम्‍युनिटी बूस्टिंग फॉर्म्‍युलेशसचा प्रयोग करणार आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayurvedic homeopathy medicines for coronavirus trial