आयुर्वेदिक उपायांनी अशी वाढवा इम्युनिटी पॉवर; पंतप्रधान मोदींनीही केला होता उल्लेख

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 17 November 2020

आयुर्वेद दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी रोगांपासून लढण्यासाठी इम्युनिटी बूस्टरचा उल्लेख केला होता

आयुर्वेद दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी रोगांपासून लढण्यासाठी इम्युनिटी बूस्टरचा उल्लेख केला होता. कोरोना महामारीच्या काळात भारतातील घराघरात आयुर्वेदिक उपाय वापरुन इम्युनिटी वाढवण्याचा प्रयोग केला. पंतप्रधान मोदी आणि आयुष मंत्रालयाने सांगितलेले इम्युनिटी बूस्टरचे प्रयोग जगभरामध्येही वापरले जाऊ लागले आहेत.

इम्युनिटी बूस्टरचे चार प्रकार

1.सामान्य उपाय

-दिवसभर गरम पाणी प्या
-30 मिनिटे योगासन, प्राणायम आणि ध्यान करणे
3. जेवन बनवताना हळदी, जिरा, धनिया आणि लसून सारख्या गरम पदार्थांचा वापर करा

2. रोग प्रतिकारशक्ती वाढवणे

-सकाळी एक चमचा च्यवनप्राश घ्या
-तुळशी, दालचिनी, काळी मिर्ची, सुंठ पासून बनवलेला हर्बल काढा दिवसातून एक किंवा दोनवेळा प्या. गुळ किंवा लिंबूचा रसही वापरु शकता.
-150 मिली दूधामध्ये अर्धा चमचा हळदी टाकून दिवसातून एक किंवा दोनदा प्यायला हली.

खोकल्यामुळे हैराण आहात? 5 पदार्थांचे सेवन ठरू शकते फायद्याचे

3. नाकात तूप किंवा नारळ तेल लावा

-सकाळी किंवा संध्याकाळी नाकाच्या दोन छिद्रांमध्ये तिळ, नारळ तेल किंवा तूप लावा
-एक चमचा तिळ किंवा नारळ तेल तोंडात टाका. न पिता 2 ते 3 मिनिटानंतर गरम पाण्याची गुठळी करुन ते थुंकून द्या. 

4.कोरडा खोकला किंवा गळ्यात खरखर होत असल्यास

1. कोरडा खोकला किंवा गळ्यात खरखर होत असल्यास मधासोबत लवंग पावडर खाऊ शकता.
2. हे उपाय साधा खोकला झाल्यास वापरु शकता. लक्षणं तीव्र असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

आयुर्वेदानुसार खाणे आणि लाईफस्टाईल असे असावे

-जेवन ताजे, गरम, पचन्यास साधे, पालेभाज्या युक्त असावे.
-तुळशीचे पाने, आद्रक आणि हळदी पाण्यात उकळून प्यावे.
-थंड पदार्थ खाणे टाळा
-8 ते 10 तास झोप घ्या आणि योगासन-प्राणायाम नियमित करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurvedic Remedies to Increase Immunity Power corona