

Ayush Krishna, an IIT Guwahati graduate, secured All India Rank 238 in UPSC Civil Services Examination 2025 after seven years of preparation and repeated attempts
esakal
आयुष्यात आलेल्या वैयक्तिक संकटातून सावरत ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली, तर कठीण परिस्थितीतही यश मिळवता येते, हे आयुष कृष्णाने दाखवून दिले आहे. आयआयटी गुवाहाटीमधून शिक्षण पूर्ण करून कॅनडामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या आयुषने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी परदेशातील नोकरी सोडली.
२३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रेयसीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. या भावनिक धक्क्यातून खचून न जाता त्याने स्वतःला सावरण्यासाठी आणि मानसिक स्थिरता मिळवण्यासाठी यूपीएससीच्या तयारीचा मार्ग निवडला. तब्बल सात वर्षांच्या संघर्षानंतर त्याने यूपीएससी २०२५ मध्ये २३८ वा क्रमांक मिळवत आपले स्वप्न पूर्ण केले.