'या' बड्या नेत्याच्या घरावर जादूटोणा? लाल चुनरीसह संशयास्पद गाठोड फेकलं!

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
azam khan family attacked by jaadu tona suspicious potley thrown
azam khan family attacked by jaadu tona suspicious potley thrown

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे त्यांचे आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, तर दुसरीकडे त्यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. आता त्यांच्यावर जादुटोणा झाल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही मध्ये ही घटना समोर आली आहे.(azam khan family attacked by jaadu tona suspicious potley thrown )

लाल चुनरीसह संशयास्पद गाठोड फेकलं

सीसीटीव्ही फुटेजनुसार, ज्यामध्ये एक व्यक्ती पिशवी आझम खान यांच्या घरावर फेकताना दिसत आहे आणि पुढे निघून जातो. याबाबत आझम खान यांची पत्नी आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. तंजीन फातिमा यांनी रामपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.

फेकलेल्या गाठोड्यात नेमकं काय आहे?

अज्ञात व्यक्तीने फेकलेल्या गाठोड्यात जुने कपडे आहेत. त्यामध्ये लाल चुनरी आहे जी जादुटोण्यात वापरली जाते. त्यामुळे आझम खान यांच्या घरावर जादूटोणा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे अज्ञात व्यक्तीचा तपास करण्यात येत आहे.

१५ वर्षांपूर्वी घडलेल्या एका गुन्ह्यात नाव गुंतल्यानंतर अब्दुल्ला खान यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, या शिक्षेनंतर अब्दुल्ला खान यांची आमदारकी अपात्र ठरविण्यात आली.

आझम खान यांनादेखील मागच्यावर्षी रामपूर सदर विधानसभा मतदारसंघातून आपली आमदारकी गमवावी लागली आहे. २०१९ साली भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com