विद्यापीठामुळे आझमगड बनेल आर्यमगड : योगी आदित्यनाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 योगी आदित्यनाथ

विद्यापीठामुळे आझमगड बनेल आर्यमगड : योगी आदित्यनाथ

आझमगड : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचे सरकार आणखी एका प्रमुख शहराचे नाव बदलण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या मतदारसंघाचेच नामांतर होईल. आझमगड हे विद्यापीठाच्या स्थापनेमुळे आर्यमगड बनेल, असे सूचक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याहस्ते शनिवारी विद्यापीठाचा कोनशिला समारंभ पार पडला. आझमगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अखिलेश हेच आहेत. त्याआधी त्यांचे पिता मुलायमसिंह यांनी येथून प्रतिनिधित्व केले. योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात म्हणाले की, आझमगड हे विद्यापीठामुळे खरोखरच आर्यमगड बनेल यात कोणतीही शंका नको.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

नामांतराचा सपाटा

उत्तर प्रदेश सरकारने फैजाबादचे नुकतेच नाव बदलून ते अयोध्या कँट असे केले. २०१८ मध्ये अलाहाबादचे प्रयागराज, तर मुघलसरायचे पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे नामांतर करण्यात आले होते.

loading image
go to top