

Arvind Singh Kills Wife, Priests and Son
esakal
Azamgarh hostage crisis involving Arvind Singh : उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे पत्नी, दोन पुजारी आणि स्वतःच्या मुलाची हत्या करून अन्य मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीचा पोलिसांच्या कारवाईत मृत्यू झाला. अरविंद सिंग असे आरोपीचे नाव असून, जवळपास आठ तास चाललेल्या तणावपूर्ण सुटका मोहिमेनंतर पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केले. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे ओलीस ठेवलेल्या तीन मुलांचे प्राण वाचले.