B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Vice President election Result : या निवडणुकीत १५२ मतांच्या फरकाने सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्ण यांनी बाजी मारली आहे.
B Sudarshan Reddy addressing the media after Vice President election defeat.

B Sudarshan Reddy addressing the media after Vice President election defeat.

esakal

Updated on

B Sudarshan Reddy’s First Reaction After Vice President Election Defeat : उपराष्ट्रपती पदासाठी आज(मंगळवार) मतदान प्रक्रिया पार पडली आणि निकालही समोर आला. यामध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे विजयी झाले. त्यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पराभूत केलं. निवडणुकीतील या पराभवानंतर आता खुद्द बी सुदर्शन रेड्डी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बी सुदर्शन रेड्डी यांनी म्हटले आहे की, ''आज खासदारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपला निर्णय दिला. मी हा निकाल पूर्ण प्रामाणिकपणे आणि आपल्या लोकशाहीवरील अढळ विश्वासाने स्वीकारतो.''

तसेच सुदर्शन रेड्डी यांनी पुढे म्हटले की, भले निवडणुकीचा निकाल त्यांच्या बाजून लागला नाही, परंतु ज्या मोठ्या उद्देशासाठी ते सर्वजण मिळून संघर्ष करत होते, तो आताही सुरू आहे. तसेच त्यांनी हेही सांगितले की, विचारधारेची ही लढाई आणखी ताकदीने सुरू राहील. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती निवड झालेल्या सी.पी.राधाकृष्णन यांना शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की, त्यांच्या कार्यकाळात देशाची सेवा करण्यात त्यांना यश लाभो.

B Sudarshan Reddy addressing the media after Vice President election defeat.
CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण ७८८ जण मतदान करू शकले अशते, परंतु ७८१ खासदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी फार जास्त ९८.२ टक्के इतकी राहिली. एकूण ७६७ मतं टाकली गेली, ज्यापैकी ७५२ मतं वैध मानली गेली. यात सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतं मिळाली. अशाप्रकारे १५२ मतांच्या फरकाने सत्ताधारी एनडीएचे सीपी राधाकृष्ण यांनी या निवडणुकीत बाजी मारली.

B Sudarshan Reddy addressing the media after Vice President election defeat.
Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

उपराष्ट्रपती पदाच्या या निकालानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये एकमेकांवर निशाणा साधणं सुरू झालं आहे. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्या विरोधी पक्षाच्या खासदारांचं १०० टक्के मतदान झाल्याच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला टोला लगावला.

मालवीय यांनी मह्टले की, विरोधी पक्षाच्या सर्व ३१५ खासदारांनी मतदान तर केलं, परंतु खरा प्रश्न आहे की कुणाला केलं?  तर यावर प्रत्युत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, भाजप केवळ अंकगणितातच जिंकते, नैतिकदृष्ट्या ते कायम हरतात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com