CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

C.P. Radhakrishnan elected as new Vice President of India: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजता संपले
C.P. Radhakrishnan elected as the new Vice President of India after defeating INDIA alliance candidate K. Sudarshan.

C.P. Radhakrishnan elected as the new Vice President of India after defeating INDIA alliance candidate K. Sudarshan.

esakal

Updated on

Vice President Election Result : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता भारताचे १७ वे उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केलं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आज(मंगळवार) मतदान प्रक्रिया पार पडली. सी.पी.राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीचे ४५२ मतं मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मतं मिळाली.

भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात ७ जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे, एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. तर ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण ७६८ खासदारांकडून मतदान झाले.

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजता संपले. मतदान संपल्यानंतर, काँग्रेसने सांगितले होते की उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षात एकजूट राहिली. सर्व ३१५ खासदारांनी मतदान केले आहे. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर १५ मतं फुटल्याचे समोर आले आहे.

C.P. Radhakrishnan elected as the new Vice President of India after defeating INDIA alliance candidate K. Sudarshan.
Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

नेमके कोण आहेत सी.पी.राधाकृष्णन? -

सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. तमिळनाडूत जन्मलेले सी.पी. राधाकृष्णन भाजपाचे मोठे नेतेही आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूर येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरु केले होते. ते कोइमतूर मतदारसंघातून 1998 आणि 1999 मध्ये लोकसभेवर दोनदा निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

C.P. Radhakrishnan elected as the new Vice President of India after defeating INDIA alliance candidate K. Sudarshan.
Nepal protests : नेपाळमधील आंदोलनाचे सीमेवर पडसाद; परिस्थिती तणावपूर्ण भारतीय पर्यटकांना रोखलं

२००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती. या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती. नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठविला होता. सी.पी. राधाकृष्णन यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काम केलं आहे. ते दोन वेळा लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत. राधाकृष्णन 1973 पासून आरएसएस आणि जनसंघाशी संबंधित आहेत.

फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले, तसेच मार्च ते जुलै २०२४ दरम्यान तेलंगाना आणि मार्च ते ऑगस्ट २०२४ दरम्यान पुदुच्चेरीच्या उपराज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. ३१ जुलै २०२४ पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com