Positive Story : रातोरात बदललं आयुष्य; आता 'बाबा का ढाबा' झोमॅटोवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

या व्हिडीओने लोकांना इतकं भावनिक केलं हा व्हिडीओ तुफान शेअर झाला आणि लोकांनी ढाब्यावर एकच गर्दी केली.

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या कमालीने रातोरात देशभर प्रसिद्ध झालेला 'बाबा का ढाबा आपल्यालाही माहीत असेलच. आता 'बाबा का ढाबा'वरुन दिल्लीतले लोक घरबसल्या जेवण ऑर्डर करु शकणार आहेत. याचं कारण असं की आता 'बाबा का ढाबा' झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलीव्हरी ऍपवर देखील उपलब्ध झाला आहे. याबाबतची माहिती स्वत: झोमॅटोनेच ट्विट करुन दिली आहे. 

हेही पहा - 'बाबा का ढाबा' का होतोय ट्रेंड 

राजधानी दिल्लीमधील मालवीय नगरमध्ये बाबा का ढाबा नावाचा एक ढाबा रस्त्याच्या कडेला होता. वयोवृद्ध दाम्पत्य हा ढाबा चालवत असून त्यांना फारसे गिऱ्हाईक येत नव्हते. एका ट्विटरने त्यांचं दु:ख जाणून घेत त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यात त्या वयोवृद्ध बाबांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. या व्हिडीओने लोकांना इतकं भावनिक केलं हा व्हिडीओ तुफान शेअर झाला आणि लोकांनी ढाब्यावर एकच गर्दी केली. अनेक सेलिब्रिटींनीही बाबांच्या ढाब्याला मदत करण्याची तयारी दाखवली असून अनेकांनी मदत केली देखील. 

या ढाब्यावर अनेकांनी गर्दी करुन बाबांच्या हातच्या जेवणाची चव तर चाखलीच सोबतच बाबांना मदत देखील केली आहे. त्यांच्या दुकानासोबत सेल्फी काढून बाबांच्या ढाब्याला रातोरात प्रसिद्धीदेखील मिळवून दिली. यादरम्यानच झोमॅटोने मदतीची तयारी दाखवली. आणि काल रात्री झोमॅटोने असं ट्विट केलं की 'बाबा का ढाबा' आता झोमॅटोवरही उपलब्ध आहे. आमची टीम तिथे त्या वयोवृद्ध दाम्पत्यासोबत काम करत आहे जेणेकरुन ते जेवू शकतील. 

हेही वाचा - राजकारणातील 'हवामान तज्ज्ञ'; बिहारच्या निवडणुकीचे वातावरण तर सांगून गेले नाहीत ना?

झोमॅटोने आणखी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की आमचं लक्ष याकडे वळवण्यासाठी सोशल मीडियावरील चांगल्या मनाच्या लोकांचे आभार. तिथे आणखीही काही बाबांचे असे ढाबे आहेत, ज्यांना मदतीची अपेक्षा आहे. जर आपल्यापैकी कुणाला त्यांची माहिती असेल तर ती आम्हाला देण्यासाठी http://zomato.com/addrestaurant यावर जावे. आम्ही असं वचन देतो की आम्ही तेच करु जे आम्ही हसऱ्या चेहऱ्यासोबत करु शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baba ka dhaba on zomato delhi