Baba Ramdev : बाबा रामदेव यांचा माफीनामा फेटाळला

‘पतंजली आयुर्वेद’तर्फे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागण्यात आली होती.
Baba Ramdev
Baba Ramdevsakal

नवी दिल्ली - दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याच्या प्रकरणात पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला.

न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याच प्रकरणात ‘पतंजली आयुर्वेद’तर्फे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागण्यात आली होती. मात्र हा माफीनामा स्वीकारण्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला. केवळ माफी मागून हे प्रकरण संपणार नाही.

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे अयोग्य असल्याचा संदेश समाजात जाणे गरजेचे आहे, अशी टिपणी खंडपीठाने केली. कायद्याचे उल्लंघन केलेल्या पतंजली आयुर्वेदवर कारवाई करण्यात उत्तराखंड सरकार अपयशी ठरल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून काढून टाका, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पतंजली आयुर्वेदला दिले होते. मात्र त्यानंतरही या जाहिराती सुरू होत्या, असा आक्षेप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून (आयएमए) घेण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com