तुम्ही सर्व आजार कसे बरे करू शकता? सुप्रीम कोर्टाकडून बाबा रामदेव यांना नोटीस

बाबा रामदेव इतर वैद्यकीय यंत्रणेचा गैरवापर कसा करू शकतात?
Baba Ramdev News
Baba Ramdev Newsesakal
Updated on
Summary

बाबा रामदेव इतर वैद्यकीय यंत्रणेचा गैरवापर कसा करू शकतात?

Baba Ramdev News : बाबा रामदेव इतर वैद्यकीय यंत्रणेचा गैरवापर कसा करू शकतात? असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय. न्यायालयाला हे जाणून घ्यायचं आहे की, बाबा रामदेव सर्व रोग बरा करू शकतात याची कशी हमी देतात? असंही कोर्टानं म्हटलंय.

इंडियन मेडिकल असोसिएशननं (Indian Medical Association IMA) बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीच्या (Allopathy Medicine) विरोधात दिलेल्या जाहिरातीवर याचिका दाखल केली असून त्यावर आज न्यायालयानं भाष्य केलं.

Baba Ramdev News
Britain PM Election : माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही, पण मी मागं हटणार नाही : ऋषी सुनक

सुप्रीम कोर्टानं बाबा रामदेव यांना नोटीस बजावली असून चार आठवड्यात उत्तर मागितलंय. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक औषधं आणि लसीकरणाविरोधात केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केलीय.

Baba Ramdev News
लोकसभेत 350 जागा जिंकणार, पटनायकांनी NDA मध्ये सामील व्हावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर

सरन्यायाधीशांनी म्हटलंय की, बाबा रामदेव यांना काय झालं? योग लोकप्रिय केल्याबद्दल आम्ही त्यांचा आदर करतोच. परंतु, त्यांनी उपचारांच्या इतर पद्धतींवर शंका घेऊ नये. त्यांनी इतरांवर टीका करणं टाळावं, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com