निपाहमुळे जारी केलेला हायऍलर्ट मागे 

पीटीआय
सोमवार, 11 जून 2018

कोझिकोडे : निपाह रोगामुळे केरळमध्ये गेल्या महिन्यात 17 जणांचा बळी गेल्यानंतर राज्य सरकारने कोझिकोडे आणि मल्लापूरम जिल्ह्यात हाय ऍलर्ट जारी केला होता, तो आता मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोझिकोडे : निपाह रोगामुळे केरळमध्ये गेल्या महिन्यात 17 जणांचा बळी गेल्यानंतर राज्य सरकारने कोझिकोडे आणि मल्लापूरम जिल्ह्यात हाय ऍलर्ट जारी केला होता, तो आता मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत राज्याचे आरोग्यमंत्री के. के. शिलजा म्हणाले, की निपाह विषाणूंचा प्रभाव आता कमी झाला असून, सर्व पक्षांची बैठक घेऊन यासंदर्भात राज्यात जारी करण्यात आलेला हायऍलर्ट मागे घेण्यात येत आहे. निपाहच्या प्रभावामुळे बंद करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्था, शाळा आणि महाविद्यालय आता 12 जून रोजी पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत, असे त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे नागरिकांना एकत्र येण्यासाठी जो प्रतिबंध करण्यात आला होता तोसुद्धा आता हटविण्यात आला आहे. 

Web Title: Back to the high alert released by Nippah